BBL 2020-21: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ एकीकडे कसोटी मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे प्रसिद्ध टी-20 लीग बिग बॅश (Big Bash League) देखील देशात सुरू आहे. या लीगच्या प्रत्येक सामन्यात असे काहीतरी घडत आहे जे प्रेक्षकांना चकित करत आहे. सोमवारी, स्पर्धेच्या 27व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सचा (Melbourne Stars) खेळाडू आंद्रे फ्लेचरने (Andre Fletcher) हॉबर्ट हरिकेनविरुद्ध (Hobart Hurricanes) बिग बॅश लीग सामन्यात दोन अफलातून कॅच घेतले आणि सामन्याचे चित्रच बदलून टाकले. इतकंच नाही तर बाउंड्री लाईनवर कॅच पकडल्यावर त्याने ज्याप्रकारे विकेट साजरी ते देखील कमालीचे होते. फ्लेचरने होबार्ट चक्रीवादळ फलंदाज बेन मॅकडेमोर्टचा (Ben McDermott) सर्वोत्कृष्ट झेल पकडला ज्यामुळे फलंदाजाचे शतक हुकले. 19व्या ओव्हरमध्ये मॅकडेमोर्ट 58 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारात 91 धावा करून बाद झाला. यापूर्वी फ्लेचरने हवेत उडी मारून कॉलिन इंग्रामचा जबरदस्त कॅच पकडला. (BBL 2020-21: डार्सी शॉर्टने राशिद खानच्या ओव्हरमध्ये चोपल्या 24 धावा, नंबर-1 टी-20 बॉलरने बाउंड्री लाईनवर घेतला थरारक कॅच, पाहा Videos)
मेलबर्न स्टार्सने मार्कस स्टोइनिसच्या दणदणीत खेळीच्या जोरावर 10 धावांनी सामना जिंकला. मार्कस स्टोनिसने नाबाद 97 धावा केल्या. हॉबर्ट हरिकेन्स संघ 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता जेव्हा सामना अधिक रोचक बनला. हॉबार्डने 2 विकेट गमवून 139 धावा केल्या आणि त्यांना 20 चेंडूंत 45 धावांची गरज होती. बिली स्टॅनलेकच्या चेंडूएवर इंग्रामने मोठा फटका मारण्याचा हेतूने शॉट मारला. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणाऱ्या फ्लेचरने हवेत उडी मारली आणि जबरदस्त कॅच पकडला ज्यानंतर त्याने मैदानावरच डांस सुरु केला. त्यानंतर, हॅचरच्या 19व्या ओव्हरमध्ये मॅकडर्मोटने शॉट खेळला. चेंडू सीमारेषाच्या दिशेने सपाट गेला आणि संघाला एक षटकार मिळेल असे दिसत असताना फ्लेचरने धाव घेतली आणि त्याच्या उजवीकडे उडी मारत चेंडू पकडला. फ्लेचरने पकडलेला झेल चाहतेच नाही तर भाष्यकार देखील थक्क झाले.
The dive, the catch, the dance moves. The Spiceman has delivered@BKTtires | #BBL10 pic.twitter.com/MU2I1D4isl
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2021
पहा फ्लेचरचा सुपर कॅच
The first one was great, this one was even better. Incredible! #BBL10 pic.twitter.com/8s2zJIfqFm
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2021
दरम्यान, आजच्या सामन्यात मॅकडर्मोटपूर्वी स्टोइनीस देखील शतक ठोकण्यातदेखील अपयशी ठरला. मेलबर्न स्टार्सचा फलंदाज सलामीला आला आणि 55 चेंडूत 97 धावा करून नाबाद परतला. स्टोइनीसने त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकार लगावले. मेलबर्न संघाने स्टोइनिसच्या जोरावर 183 धावांपर्यंत मजल मारली आणि अखेर विजय मिळवला. मेलबर्नकडून सॅम रेनबर्डने 2 गडी बाद केले. बिली स्टॅनलेक, अॅडम झांपा आणि लियम हॅचर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.