बांगलादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यात आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चा तिसरा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) होणार आहे. हा रोमांचक सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. अफगाणिस्तान बांगलादेशला हरवून सुपर 4 मध्ये स्थान मिळवण्याकडे लक्ष देईल, तर बांगलादेशला विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. T20I क्रिकेटमध्ये, अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड मॅचमध्ये 8 पैकी 5 सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. अशा स्थितीत आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. सामन्यापूर्वी बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती पाहूया.
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 मधील तिसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 सामना 30 ऑगस्ट रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 मधील तिसरा सामना किती वाजता सुरू होईल?
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामनाचे थेट प्रक्षेपण तुम्ही कुठे आणि कसे पाहू शकता?
तुम्ही बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 चा तिसरा सामना विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. (हे देखील वाचा: Shubhman Gill With Sara Ali Khan: स्टार क्रिकेटर शुभमन गिल दिसला सैफ अलीची मुलगी सारा अली खानसोबत, फोटो व्हायरल (See Photo)
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामनाचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेटवर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 ची तिसरी मॅच लाइव्ह पहायची असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.