Bangladesh Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team ICC Womens T20 World Cup Warm-up Matches 2024: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक सराव सामना बांगलादेश महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघात खेळवयला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईच्या आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 मध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्कॉटलंडने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. तर श्रीलंकेने बांगलादेशचा 33 धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता दोन्ही संघांचे सराव सामने अत्यंत महत्त्वाचे असून त्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. (हेही वाचा: Ireland vs South Africa 2nd T20I 2024 Highlights: आयर्लंडने केला मोठा गेम, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला लोळवलं; येथे पाहा सामन्याचे हायलाइट्स)
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सातवा सराव सामना कधी खेळला जाईल?
बांगलादेश महिला विरुद्ध पाकिस्तान महिला यांच्यातील सातवा सराव सामना आज सोमवार, 30 सप्टेंबर रोजी आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2, दुबई येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
अजून तरी सराव सामन्यांचे प्रसारण आणि प्रसारण तपशीलांची माहिती समोर आलेली नाही. मॅच अपडेट्ससाठी, चाहते आयसीसी मॅच पोर्टलद्वारे थेट स्कोअर पाहू शकतात.
दोन्ही संघांचे खेळाडू
बांगलादेश : निगार सुलताना जोती (C), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अख्तर, जहाँआरा आलम, दिलारा अख्तर, ताज नेहार, शती राणी, बिशा राणी .
पाकिस्तान : फातिमा सना (C), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब, तोबा हसन .