Ireland vs South Africa 2nd T20I 2024 Highlights: आयर्लंडने केला मोठा गेम, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला लोळवलं; येथे पाहा सामन्याचे हायलाइट्स

आयर्लंडने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखली. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 6 टी-20 सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये आफ्रिकन संघाने आयर्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही

Ireland vs South Africa 2nd T20I 2024 Highlights: आयर्लंडने केला मोठा गेम, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला लोळवलं; येथे पाहा सामन्याचे हायलाइट्स
SA vs IRE (Photo Credit - X)

Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd T20 2024 Highlights: आयर्लंडने रविवारी 29 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव (IRE Beat SA T20I) करत मोठा पराभव केला. यासह आयर्लंडने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखली. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 6 टी-20 सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये आफ्रिकन संघाने आयर्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही. आयर्लंडच्या या विजयासह, मालिका 1-1 ने संपली, दुर्दैवाने मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी तिसरा सामना नाही. आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका फक्त 2 सामन्यांची होती. आता या दोन्ही संघांमध्ये 2 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. आयर्लंडच्या मोठ्या विजयामुळे आता क्रिकेटप्रेंमी वनडे मालिकेवरही नजर ठेवुन असतील.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).