Ajinkya Rahane Love Story: परदेशात आपल्या शानदार प्रदर्शनाने क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भारताच्या कसोटी संघाचा (India Test Team) उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) लहानपणापासून मैत्रीण राधिका धोपावकरची (Radhika Dhopavkar) साथ मिळाली आहे. दोघे बालपणीचे मित्र होते आणि कॉलेजमध्ये त्यांच्या मैत्रीला प्रेमाचा बाहेर फुलला. या मराठमोळ्या जोडीची लव्हस्टोरीही बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. एकाच शाळेत शिकत होते जिथे दोघांनी एकमेकांना पसंत केलं. आणि अखेरीस दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यचा जन्म महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर जिल्ह्यातील अश्वि खुर्द या गावी झाला. अजिंक्य आणि राधिका एकाच परिसरात राहत होते. दोघे बालपणीचे मित्र होते. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या मैत्रीची कल्पना होती पण अजिंक्य-राधिका एकमेकांच्या प्रेमात पडतील याची कल्पनाही नव्हती. (IND vs AUS 3rd Test: एमएस धोनीची बरोबरी करण्यापासून अजिंक्य रहाणे एक पाऊल दूर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विक्रमाची संधी)
अजिंक्य आणि राधिका धोपावकर शेजारी राहायचे आणि दोघांत घट्ट मैत्री होती. शिवाय, दोन्ही परिवार वर्षानवर्षे एकमेंकाना ओळखत होते. काळाच्या ओघात दोघे एकमेंकाना पसंत करू लागले. अखेरीस, अजिंक्य आणि राधिका धोपावकर 26 सप्टेंबर, 2014 रोजी लग्नबंधनात अडकले. अजिंक्य आणि राधिकाला 2019 मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. दरम्यान, अजिंक्य कराटेमध्ये मास्टर आहे हे फारच कमी लोकांना माहिती असेल. वयाच्या 12व्या वर्षी अजिंक्यने कराटे येथे ब्लॅक बेल्ट जिंकला होता. याखेरीज क्रिकेटमधील अजिंक्यच्या नोंदीही चाहत्यांना चांगल्याच ठाऊक आहेत. सशक्त तंत्रज्ञानाने रहाणे आयपीएलमधील एका ओव्हरमध्ये सलग 6 चौकार ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. इतकंच नाही तर अजिंक्यच्या नेतृत्वात टीम इंडियाने कर्णधार म्हणून सलग तीन सामन्यात संघाचे विजयी नेतृत्व केले आहे.
2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील पहिल्या सामन्यात रहाणेला पहिल्यांदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 2018 कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियाच्या 2020 दौऱ्यावरील मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजयी संघाचे नेतृत्व केले आहेत.