ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेंड विनी रमन सोबत Engagement ची केली घोषणा
ग्लेन मॅक्सवेल विनी रमनसह (Photo Credits: Instagram)

ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने बुधवारी सोशल मिडीयावर गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) सोबत साखरपुड्याची घोषणा केली. मॅक्सवेल आणि विनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसह आणि नातेवाईकांशी शेअर केली आहे. मॅक्सवेलने त्याचा आणि विनीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला ज्यात ती तिची अंगठी दाखवत पोज करत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मॅक्सवेलने रिंगची इमोजी दिली आहे. भारतीय वंशाची असलेल्या विनीनेही याविषयीची माहिती इंस्टाग्रामवर दिली. "गेल्या आठवड्यात माझ्या आवडत्या व्यक्तीने मला त्याच्याशी लग्न करण्यास विचारले" होय, "तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले. मॅक्सवेल आणि विनी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मॅक्सवेलची नुकतीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली होती, परंतु त्यानंतर डाव्या कोपरात शस्त्रक्रियेमुळे त्याला संघातून बाहेर केले गेले. (Video: बिग बॅश लीग मॅचच्याआधी मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल बनला Firefighter, स्टेडियम बाहेर लागलेल्या आगीवर आणले नियंत्रण)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) साखरपुड्यासाठी मॅक्सवेल आणि विनीचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटरवर दोघांचा फोटो शेअर करून लिहिले की, "ग्लेन मॅक्सवेलने नुकताच साखरपुडा जाहीर केला आहे आणि त्याला खूप-खूप शुभेच्छा." दरम्यान, सर्वांनाच विनी कोण आहे, ती काय करते असा प्रश्न पडला असेल. विनीच्या सोशल मीडियानुसार ती मेलबर्न आधारित फार्मासिस्ट आहे. विनी आणि मॅक्सवेल एकमेकांना 2 वर्षांपासून डेट करत आहेत. विशेष म्हणजे मॅक्सवेलने याआधी उघडकीस केले होते की विनीनेच त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखल्या ज्याने त्याला गेल्या वर्षी स्पर्धात्मक क्रिकेटपासून विश्रांती घेण्यास भाग पाडले.

 

View this post on Instagram

 

💍

A post shared by Glenn Maxwell (@gmaxi_32) on

31 वर्षीय मॅक्सवेलने नुकतंच मानसिक समस्येने ग्रासले असल्याने मध्यभागी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मात्र, नंतर त्याने पुनरागमन केले असले तरी सध्या तो दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर आहे. दरम्यान, मागील वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात मॅक्सवेलला आगामी हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने तब्बल 10.75 कोटी रुपयांत विकत घेतले होते.