ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/BBL)

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो पण सोमवारी त्याने क्रिकेट मैदानाबाहेर असे कृत्य केले की लोक कौतुक करीत आहेत. बिग बॅश लीगच्या (Big Bash League) 17 व्या सामन्यापूर्वी लॉन्सेस्टनमधील (Launceston) औरोरा स्टेडियमच्या बाहेर अचानक आग लागली, त्यावेळी मॅक्सवेल तेथे उपस्थित होता आणि त्याने आग विझवण्यासाठी उडी घेतली.  सामन्यापूर्वी डेल स्टेन (Dale Steyn) आणि ग्लेन मॅक्सवेल एकत्र होते, पण त्यानंतर अचानक स्टेडियमच्या आवारा बाहेरील कोरड्या गवतात आग लागली. मॅक्सवेल त्वरित आगीच्या दिशेने पळाला आणि त्याने तत्काळ अग्निशमन यंत्राचा ताबा घेतला. स्टेनने घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तयार करुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. ऑस्ट्रेलियामधील जंगलांच्या आगीने खळबळ उडाली आहे. आगीमुळे हजारो हेक्टर वनराई जळून खाक झाली आहे. या आगीत कोट्यवधी जनावरे मरण पावली आहेत, बऱ्याच जणांना त्यांची घरे गमावली लागली आहे. आगीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये श्वास घेणेही कठीण झाले आहे. नुकतीच बिग बॅश लीगमधील एक सामना खराब हवामुळे रद्द करावा लागला होता, ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील अश्या कारणामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळी होती.  (BBL 2019-20: रशीद खान याची अंपायरने केली टिंगल, आऊट देण्यासाठी उचलेल्या बोटाने खाजवू लागले नाक, पाहा Video)

व्हिडिओमध्ये मेलबर्न स्टार्सचा कर्णधार मॅक्सवेल अग्निशामक यंत्रणासह रस्त्यावर धावत असून रस्त्याजवळ लागलेली लहान आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पाहा या घटनेचा व्हिडिओ:

मेल्बर्न स्टार्सने सोमवारी झालेल्या होबार्ट हेरिकेन्सचा (Hobart Hurricanes) पराभव केला. पावसामुळे दोन्ही संघांमध्ये 11 ओव्हर्सचा सामना रंगला. हरिकेन्सने पहिले फलंदाजी करत 5 बाद 69 धावा केल्या. हेरिकेन्ससाठी कालेब जेवेलने सर्वाधिक 28 धावा केल्या. प्रत्युत्तराला 11 षटकांत 80 धावांचे लक्ष्य देण्यात आले. सलामी फलंदाज मार्कस स्टोईनिस (Marcus Stoinis) आणि पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली आणि स्टार्सला विजय मिळवून दिला. दरम्यान, अलीकडेच मॅक्सवेलने श्रीलंकाविरूद्ध टी-20 मालिकेच्या दरम्यान त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केले की मॅक्सवेल ब्रेकवर जाईल. पण आता नुकत्याच जाहीर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मॅक्सवेलची वनडे संघात निवड झाली आहे. याशिवाय, अलीकडेच मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने 10.75 कोटी रुपयांत विकत घेतले. मॅक्सवेलची बेस प्राइस 2 कोटी होती.