IND W vs AUS W (Photo Credit - X)

Australia Women's National Cricket Team vs Indian Women's National Cricket Team 3rd ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, तिसरा एकदिवसीय सामना आज, बुधवार 11 डिसेंबर रोजी W.A.C.A, पर्थ येथे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेल सदरलँडने ऑस्ट्रेलियाकडून शतक झळकावले. ॲनाबेल सदरलँडने 95 चेंडूत 110 धावा केल्या. यादरम्यान सदरलँडने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय ॲशले गार्डनरने 60 चेंडूत 50 धावा करत सदरलँडसोबत मोठी भागीदारी केली.

कर्णधार ताहलिया मॅकग्राने 50 चेंडूत 56 धावा, फोबी लिचफिल्डने 25 धावा, जॉर्जिया वोलने 26 धावा, एलिस पेरीने 4 धावा आणि बेथ मुनीने 10 धावा केल्या. अरुंधती रेड्डीने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. अरुंधती रेड्डीने पहिले 4 बळी घेतले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अरुंधती रेड्डीने 10 षटकात 2 मेडन षटक आणि 26 धावा देऊन 4 विकेट घेतल्या.

हे देखील वाचा: Google Year in Search 2024 in India: गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना, पाहा टॉप 5 मॅचची यादी

सध्या टीम इंडियाला क्लीन स्वीप टाळण्यासाठी 50 षटकांत 299 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे. दुसरीकडे भारताचा व्हाईटवॉश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताला 299 धावांआधीच रोखावे लागणार आहे.