वसीम अकरम याने हरवलेल्या घड्याळाबद्दल केलेल्या पोस्टवर Netizens ने दिलेल्या मजेदार प्रतिक्रिया पाहून तुम्हीही व्हाल लोट-पोट, पाहा Tweet
वासिम अक्रम (Photo Credit: Wasim Akram/Twitter)

पाकिस्तान (Pakistan) संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट भाष्यकार वसीम अकरम (Wasim Akram) यांनी बुधवारी ट्विटरवर आपल्या हरवलेल्या घड्याळाविषयी पोस्ट शेअर केली. शक्य असल्यास घड्याळ पुन्हा मिळविण्याची मदत मागण्यासाठी त्याने एमिरेट्स (Emirates) एअरलाईन, या विमान सेवा ऑपरेटरला टॅग केले. एअरलाइन्सने अकरमला घड्याळ आणि विमानाचा तपशील द्यावा असे सांगितले. हे सामान्य विनिमय असल्यासारखे वाटत असले तरी अक्रमने कल्पना केली नसेल कि यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येईल. पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या त्यांच्या खेळासह त्यांच्या वक्तव्यासाठीही चर्चेत बनून राहिले आहे. दानिश कनेरिया याने केले आरोप त्याच्या पाकिस्तानी क्रिकेटपटूनि दिलेल्या प्रतिक्रियांमुळे पाकिस्तानी क्रिकेटबाबत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि आता अकरमच्या ट्विटने यात अजून एक भर घातली आहे.

“फ्लाइट EK 605 सीट 10 ए KHI-DXB वर माझे घड्याळ हरवले. मी आता इमिरेट्सचे अनुसरण करीत आहे. दुबईत मी सर्व ग्राहक सेवा वापरल्या आहेत आणि पुरेसे झाले असल्याची खात्री मला वाटत नाही म्हणून कृपया एखाद्याने लवकरात लवकर संपर्क साधावा. हे घड्याळ कौटुंबिक वारसा आहे," अक्रमने ट्विटरवर लिहिले. यासंदर्भात एमिरेट्सच्या हेल्प डेस्कने “हाय वसीम, कृपया आपल्या उड्डाण तपशील आणि ईमेल पत्त्यासह घड्याळाचे वर्णन आम्हाला मेसेजद्वारे कळवा. आम्ही आमच्या गमावलेल्या आणि सापडलेल्या कार्यसंघासह हे तपासून पाहू आणि आपल्याला कळवू. धन्यवाद." ट्विटरवरील त्याच्या चाहते आणि फॉलोअर्सने या संभाषणाला साधारण राहू दिले नाही. यूजर्सने अनेक विनोदी टिप्पण्या पोस्ट केल्या ज्यात त्यांनी या दिग्गज वेगवान गोलंदाजाची थट्टा करण्यात कोणतीही कमी ठेवली नाही. हे ट्विट्स पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल, पाहा:

अकरमचे ट्विट

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नवीन घ्या ना वासिम भाऊ

घड्याळाचे मूल्य आणखी वाढले आहे

आणि त्यांना काश्मीर हवा आहे…

मी तुम्हाला नवीन भेट म्हणून देईन

पत्रकार परिषद जाहीर करा ...

वासिम पाकिस्तानचे सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून ओळखले जातात. वनडे विकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे. अकरमने एकूण 502 गडी बाद केले आहे. 2003 विश्वचषक स्पर्धेदरम्यान वनडे क्रिकेटमध्ये 500 विकेटचा टप्पा गाठणारा तो पहिला गोलंदाज होता. अकरमला 'स्विंगचा सुलतान'ही म्हटले जाते.