जोफ्रा आर्चर याच्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाल्यानंतर शोएब अख्तर याचे ट्विट, युवराज सिंह याच्याकडून रावळपींडी एक्सप्रेसची फिरकी
युवराज सिंह (PTI Photo)आणि शोएब अख्तर (Photo Credit: Video Screen Grab)

इंग्लंड (England)-ऑस्ट्रेलियामधील (Australia) अ‍ॅशेस (Ashes) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चर याच्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याला झालेल्या दुखापतीबाबत आर्चरची टीका केली जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने आर्चरविरूद्ध एक ट्वीट केली आणि याला उत्तर देत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने त्याची खिल्ली उडविली आहे. लॉर्ड्स (Lords) येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यादरम्यान जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सर बॉलमुळे स्मिथला दुखापत झाली, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. अख्तरने या संपूर्ण किस्साबद्दल आर्चरला फटकारले. (ICC Test Ranking: स्टिव्ह स्मिथने मिळवले दुसरे स्थान, पॅट कमिन्सने साधली ग्लेन मॅकग्रा याच्या ऑल-टाइम गुणांची बरोबरी)

आर्चरची शाळा घेत शोएब म्हणाला, “जोफ्रा आर्चरकडे शिष्टाचार नाही. आपण टाकलेल्या बाऊन्सरमुळे खेळपट्टीवरच कोसळलेल्या स्मिथची चौकशी करायलाही आर्चर सरसावला नाही.” शिवाय, “बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूच्या आघातानं फलंदाज दुखावतो किंवा खेळपट्टीवर कोसळतो तेव्हा त्याची चौकशी करणे, त्याला सावरणे तसेच त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. माझ्या चेंडूमुळे दुखावलेल्या फलंदाजांना सावरण्यासाठी मी नेहमीच प्रथम धाव घेतली आहे.” यावर युवीने अख्तरला ट्रोल केले आणि लिहिले, "हा तुम्ही असं करत होतात! पण फलंदाजाला तुम्ही अजून असे काही चेंडू येतील असे सांगायचे."

युवीने अख्तरला ट्रोल केले

स्मिथ जखमी झाल्यानंतर आर्चरनं त्याची विचारपूस केली नाही. दरम्यान, स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. स्मिथने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.