सध्या सुरु असलेल्या अॅशेस (Ashes) मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने आपली विजयी घुडदौड सुरु ठेवली आहे. आणि याचे त्याला फळ देखील मिळाले. पहिल्या अॅशेस टेस्टमध्ये दोन शतक करत स्मिथने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यास मोलाचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) चेंडूवर दुखापत होण्याआधी पहिल्या डावात स्मिथने अर्धशतक करत 92 धावांची खेळी केली. याचे फळ म्हणून स्मिथने फलंदाजांसाठीच्या एमआरएफ टायर्स आयसीसी टेस्ट क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले आहे. दरम्यान, जोफ्रा आर्चरने गोलंदाजांच्या क्रमवारीत क्रमांकावर 83 व्या क्रमांकावर प्रवेश केला आहे. (स्टिव्ह स्मिथ याच्याशिवाय या 5 क्रिकेटपटूंसाठी जोफ्रा आर्चर बनला कर्दनकाळ; 'हा' भारतीय देखील बनला होता शिकार, वाचा सविस्तर)
दुसर्या अॅशेस सामन्यात स्मिथच्या 92 धावांनी तीन डावांमध्ये 126 च्या प्रभावी सरासरीने 378 धावा केल्या. एक वर्षासाठी बंदी असूनही, स्मिथने आयसीसी क्रमवारीत 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अॅशेसच्या दुसऱ्या टेस्टपूर्वी स्मिथ 857 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता आणि विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची ही झेप भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अव्वल स्थानाला आव्हान देणारी ठरली आहे. कोहली 922 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु स्मिथ आणि त्याच्यातील गुणांचे अंतर केवळ 9 गुणांचे राहिले आहे.
Steve Smith - in three innings after a year out of the game - is now just nine ranking points away from being World No.1 Test batter https://t.co/ZhLBeZvbs1 #Ashes pic.twitter.com/BJydiewDmh
— cricket.com.au (@cricketcomau) August 19, 2019
दुसरीकडे, पॅट कमिन्स (Pat Cummins) याने गोलंदाजांसाठीच्या क्रमवारीवर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. कमिन्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाजासाठी आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट टेस्ट गुणांची बरोबरी केली आहे. कमिन्सने त्याच्या गोलंदाजीच्या क्रमवारीत 16 गुणांची भर घातली आणि आता 914 गुणांसह तो अव्वल क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी आतापर्यंतचा सर्वोच्च क्रमांकाचा मान मिळालेल्या एक नवीन वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) याच्या रेकॉर्डची बरोबरी त्याने बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या दुसर्या डावात द ओव्हल येथे झालेल्या सामन्यात पाच विकेट्स घेत मॅकग्राने 2001 मध्ये 914 गुणांची नोंद केली होती. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतल्या कामगिरीमुळे अनेक ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी क्रमवारीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ट्रॅव्हिस हेड दोन स्थानांवर चढला आणि 18व्या क्रमांकावर आला, तर मार्नस लाबूशेन गुणतालिकेत 16 स्थानांची झेप घेत 82 व्या क्रमांकवर पोहचला आहे. त्यांचे इंग्लिश प्रतिस्पर्धी विशेषत: बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो आणि रोरी बर्न्स यांनीही प्रगती केली आहे.
JUST IN: Pat Cummins equals the Australian ALL-TIME mark on the ICC's Test bowling rankings: https://t.co/ZhLBeZvbs1 #Ashes pic.twitter.com/JfjU6r2tWe
— cricket.com.au (@cricketcomau) August 19, 2019
पण, ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज-डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची घसरण झाली आहे. गोलंदाजांमध्ये लॉर्डर्स (Lords) येथे पदार्पणाच्या सामन्यात आर्चरने 91 धावांवर 5 गडी बाद करत रँकिंगमध्ये 83 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. फक्त सहावा टेस्ट खेळणारा जॅक लीच याने आठ स्थानांझेप घेत 40 व्या स्थानावर पोहचला आहे. यावर्षी अॅशेसमध्ये 16.30 च्या सरासरीने सर्वाधिक विकेट घेणारा कमिन्सने बॅट आणि बॉलने समाधान कारक खाली केली. आणि याच्या जोरावर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो पाचव्या क्रमांक पोहचला आहे.