स्टिव्ह स्मिथ याच्याशिवाय या 5 क्रिकेटपटूंसाठी जोफ्रा आर्चर बनला कर्दनकाळ; 'हा' भारतीय देखील बनला होता शिकार, वाचा सविस्तर
जोफ्रा आर्चर आणि मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने आपल्या गोलंदाजीने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आर्चरच्या चेंडूचा सामना करणे कोणत्याही फलंदाजाला सोप्पी गोष्ट नाही. आर्चरने आपल्या वेगवान गतीने क्रिकेटविश्वात खळबळ उडवली आहे. चकाकीच्या वेगाने येत असलेल्या चेंडूपुढे फलंदाजांचे एकही चालत नाही. टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये खळबळ उडवल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये प्रभाव पडण्याच्या तयारीत आहे. आजवर त्याच्या वेगाने अनेक फलंदाज चक्रावले आणि चेंडू त्यांच्या डोक्यावर किंवा तोंडावर आदळला आहे. बरेच फलंदाज जखमीदेखील झाले. आयपीएलपासून विश्वचषकपर्यंत आणि आता अ‍ॅशेस (Ashes) मालिकेपर्यंत त्याची गोलंदाजी प्रचंड कहर करीत आहे. (Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टच्या अंतिम दिवशी जो डेन्ली याने लपकलेल्या टिम पेन याच्या अविश्वसनीय एक हाती कॅचचं Twitter वर कौतुक)

नुकत्याच संपुष्टात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याला आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्मिथला मैदान सोडावं लागलं. 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला आणि तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर मार्कस लाबुशेन याला संघात समाविष्ट करण्यात आले. पण स्मिथ हा आर्चरच्या वेगवान गोलंदाजीचा काही पहिला बळी नव्हता. याआधी देखील आर्चरने अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना आपल्या चेंडूने घायाळ केले आहेत.

मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne)

स्मिथच्या जागी बदली म्हणून आलेला लाबूशेनदेखील आर्चरच्या वेगातून सुटू शकला नाही. आर्चरचा पहिला चेंडू त्याच्या तोंडाला लागला आणि तो क्रीझवर पडला. तो त्वरित उठला, पण तरीही त्याला फिजिओकडून मदत घ्यावी लागली. आर्चरच्या बॉलची गती ताशी 147 किलोमीटर होती. बॉल त्याच्याकडे येईल अशी लाबूशेनला अपेक्षाच नव्हती. उस्मान ख्वाजा बाद झाल्यावर लाबूशेन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey)

अॅलेक्स केरी (Image Credit: Twitter/Syed Atif)

याआधी विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यादरम्यान वर्ल्ड कपमध्ये एलेक्स कॅरी सोबतही असाच भयावह प्रकार घडला होता. कॅरीच्या हनुवटीला चेंडू लागल्यानं भयंकर रक्तस्राव होत होता. कॅरीला दुखापत झाल्याचं दिसताच स्मिथसह इंग्लंडचे खेळाडूदेखील मदतीसाठी पुढे आले. त्यानंतर कॅरीच्या जखमेवर मलमपट्टी केली तरीही त्यातून रक्तस्राव सुरू होता. आणि अशा परिस्थितही कॅरीने सामना खेळला. शिवाय, आर्चरचा बाउन्सर थेट कॅरीच्या हेल्मेटवर इतक्या वेगाने आदळला की हेल्मेट डोक्यातून उडून पडले.

एम एस धोनी (MS Dhoni)

(Photo Credit: @ipl/Twitter)

विश्वचषकआधी प्रत्येक खेळाडूने आयपीएलमधील आपला दम दाखवला. या दरम्यान त्याचे बरेच महत्वाचे खेळाडू अजूनही जखमीदेखील झाले. एमएस धोनीचे नाव देखील या यादीत आहे. जयपूरमधील राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात आर्चरचा चेंडू 140 किमी तासापेक्षा जास्त वेगाने टाकलेला बाउन्सर धोनीच्या हेल्मेटला लागला. चांगली गोष्ट म्हणजे धोनीला काहीही झाले नाही. आर्चरचा चेंडू धोनीच्या हेल्मेटला लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि लोकांनी आपलय प्रतिक्रिया देणे सुरू केले. संजय मांजरेकर यांनी ट्वीट केले की, "जोफ्रा आर्चरचा वेगवान बॉल, धोनी यावेळी बचावला आणि बॉल त्याच्या हेल्मेटला लागला. असं फार कमी पाहायला मिळते." पहा आर्चरचा धोनीला टाकलेला बाउन्सर 

हाशिम अमला (Hashim Amla)

हाशिम अमला (Photo Credit: @piersmorgan/Twitter)

विश्वचषकमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आर्चर याचा चेंडू अमलाच्या चेहऱ्याच्या समोर हेल्मेटला लागला. विश्वचषकमधील एका ओव्हरमध्ये आर्चर आणि अमला यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. पहिला चेंडू रिक्त गेल्यानंतर, दुसर्‍या चेंडूवर अमलाने चौकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंमध्ये जोरदार पुनरागमन करत आर्चरने अमलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पाचवा चेंडू त्याने बाउन्सर टाकला. अमलाला चेंडूच्या वेगाचा अंदाज येऊ शकत नाही. आर्चरच्या या बॉलची गती ताशी सुमारे 145 किलोमीटर होती. बॉल लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फिजिओ त्वरित मैदानात आले आणि बराच वेळ त्याच्याशी बोलल्यानंतर अमला मैदानाबाहेर गेला.

केन विल्यमसन  (Kane Williamson)

केन विलियमसन (Photo Credit: Alex Davidson/Getty Images)

विश्वचषकमधील न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात आर्चरचा चेंडू किवी कर्णधार विल्यमसन याच्या हेल्मेटवर लागला. आणि विल्यमसनच्या हेल्मेटचा नेक गार्डच मोडला.