Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टच्या अंतिम दिवशी जो डेन्ली याने लपकलेल्या टिम पेन याच्या सुपरमॅन कॅचचं Twitter वर कौतुक
(Photo Credit: England & Wales Cricket Board/YouTube)

विश्वजेता इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील 5 सामन्यांच्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्ट मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टेस्टचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी सुरु झालेल्या या मालिकेच्या चारही दिवसात रोमांच बघायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 258 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरूवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) दोघेही संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. याच दरम्यान, माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा चेंडू लागल्याने मैदान सोडावं लागलं आणि त्यानंतर दुसऱ्या डावात तो मैदानात उतरला. (Ashes 2019: इंग्लंडविरुद्ध कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याने टिपला रोरी बर्न्स याचा अफलातून एक हाती कॅच, पहा Video)

दुसरी मालिका दोन्ही संघात थरारक सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामना जिंकल्यावर इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या अंतिम डावात त्यांना बाद करण्याचा भरपूर प्रयत्न केला. याचच एक उदाहर म्हणजे इंग्लंडच्या जो डेन्ली (Joe Denly) याने लपकला कर्णधार टिम पेन (Tim Paine) याचा अविश्वसनीय एक हाती झेल. 149 धावांवर 5 गडी बाद होताच पेन मैदानावर आला. आर्चरच्या चेंडूवर पेनने डाव्याबाजूला हवेत शॉट मारला. तो शॉट सीमारेषेच्या बाहेर जाईल असे वाटत असल्यास डेन्लीने डाव्याबाजूला झेप घेत कॅच पकडला. आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला फक्त 4 धावांवर माघारी परतवले. डेन्लीने घेतलेल्या या कॅचसाठी त्याचे ट्विटरवर कौतुक होत आहे. पहा या अविश्वसनीय झेलचा हा व्हिडिओ:

जो डेन्लीचा एक चित्तथरारक #Ashes कॅच

यावर्षीचा सर्वोत्कृष्ट झेल

जो डेन्ली @QPR क्रमांक 1 असावा.

जो डेन्ली

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत आर्चरच्या भेदक माऱ्यानं स्मिथ बाद झाला नाही पण जखमी होऊन त्याला मैदानाबाहेर गेला. स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा उसळता चेंडू थेट त्याच्या मानेवर आदळला आणि मैदानावर कोसळला. यावेळी सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.