कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (Photo: @FoxCricket/Twitter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ पुन्हा एकदा अ‍ॅशेस (Ashes) मालिकेत आमने-सामने आले आहेत. दुसरी अ‍ॅशेस टेस्ट इंग्लंडच्या प्रतिष्टीत लॉर्ड्स मैदानावर खेळली जात आहे. 14 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी पावसाने खोडा घातला. त्यामुळे पहिल्या दिवशी टॉस आणि खेळ शक्य होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात देखील उत्तम झाली. सुरुवातीलाच जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांना बाद करत कांगारू गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर जो डेन्ली याच्यासाथीने सलामीवीर रोरी बर्न्स (Rory Burns) याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. (SL vs NZ 1st Test: पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ट्रेंट बोल्ट याने स्वतःला केले झेलबाद, जाणून घ्या कसे)

डेन्ली 30 धावा करत माघारी परतला. त्यानंतर, बर्न्सदेखील 53 धावा करत बाद झाला. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या गोलंदाजीवर कॅमेरून बॅनक्रॉफ्टने (Cameron Bancroft) शॉर्ट लेगवर प्रतिम एक हाती झेल टिपला. बर्न्सला बाद करत 4 बाद 116 धावा अशी स्थिती झाली. सोशल मीडियावर बॅनक्रॉफ्टने टिपलेल्या या अप्रतिम कॅचचे अनेक यूजर्सने कौतुक केले. पहा हा व्हिडिओ इथे:

पहा ट्विटरवर चाहत्यांनी बॅनक्रॉफ्टने पकडलेल्या अविश्वसनीय कॅचवर कशी प्रतिक्रिया दिल्या:

ऑस्ट्रेलियन संघात अनेक खेळाडू सध्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर खूष असतील

स्टीव्ह वॉ यांनी अलीकडे सांगितले की कॅमरून बॅनक्रॉफ्ट हा सर्वात उत्तम शॉर्ट लेग फील्डर आहे

हा अप्रतिम कॅच आहे

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने सलग दोन शतकं करत इंग्लंडकडून सामना खेचून आणला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या निशाण्यावर असेल तो स्मिथ. आणि त्याला रोखण्यासाठी इंग्लंडच्या संघाने त्यांचा सर्वात दमदार गोलंदाज जोफ्रा आर्चर याला संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहेत. याचबरोबर आर्चरने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.