इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील 31वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 55 धावा केल्या. तसेच या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) लाजिरवाणा विक्रम केला आहे. (हे देखील वाचा: MI vs PBKS: अर्जुन तेंडुलकरच्या खतरनाक यॉर्करने पंजाबच्या या फलंदाजाला बसला धक्का, वानखेडेवर घेतली पहिली विकेट (Watch Video)
अर्जुन तेंडुलकरच्या नावे लज्जास्पद विक्रम
पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला दिले. या षटकात त्याने केवळ 5 धावा दिल्या. त्यानंतर त्याने सातवे षटक केले. या षटकात त्याने 12 धावा दिल्या. यानंतर तो 16 वे ओव्हर टाकायला आला. या षटकात त्याने 31 धावा दिल्या, जे आयपीएलच्या इतिहासातील सहावे सर्वात महाग षटक आहे. यासह त्याच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम जमा झाला.
Arjun Tendulkar bowled the joint-most expensive over in #IPL2023 so far (31 runs).
📸: Jio Cinema pic.twitter.com/VuJMNh4l7R
— CricTracker (@Cricketracker) April 22, 2023
आयपीएल इतिहासात एका षटकात गोलंदाजाने दिलेले सर्वाधिक धावा:
हर्षल पटेल - 37 धावा
प्रशांत परमेश्वरन - 37 धावा
डॅनियल सॅम्स - 35
धावापरमिंदर अवाना - 33 धावा
रवी बोपारा - 33 धावा
अर्जुन तेंडुलकर - 31 धावा
यश दयाल - 33 धावा