लॉकडाउनच्या काळात अनुष्का शर्माने केली विराट कोहली याच्याकडे भलतीच मागणी, पाहा व्हिडिओ
Virat- Anushka (Photo Credit: Instagram)

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येकजण आपला वेळ कुटुंबासोबत घातवत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घातवत आहे. या दिवसांत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडिया अधिक अक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुष्ंबकाने विराट कोहलीसोबत (Virat Kohli) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, अलिकडे तिने शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिने विराट कोहलीकडे भलतीच मागणी केली आहे. हे ऐकल्यानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लॉकडाउनच्या काळात सर्व क्रिकेटपटू आपपल्या कुटुंबियांना वेळ देत आहेत. अजिंक्य राहाणे, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या आदी आपल्या कुटुियांना वेळ देण्याबरोबर घरच्या कामातही हातभार लावत आहेत. पण सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत अनुष्का शर्मा विराट कोहलीकडे भलतीच मागणी करत आहे. दरम्यान, ए कोहली, ए कोहली, चल चौका मार, अशी ती बोलत आहे. तसेच, मला असे वाटते की, हा आपली फिल्डला मिस करत आहे. याशिवाय आपल्या लाखो चाहत्यांना आणि त्यांच्या अनोख्या अंदाजाला मिस करत असेल, असे तिने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. मात्र, या व्हिडिओत विराट कोहलीने अनुष्का शर्माकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. हे देखील वाचा- कोरी अँडरसनने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची केली तुलना, म्हणाला दोघांच्या 'या' क्वालिटीमुळे टीम इंडियाला मिळतंय यश

पाहा व्हिडिओ- 

अनुष्का शर्माच्या या व्हिडिओलवा कार्तिक आर्यनने कंमेन्ट केली आहे. तसेच आपण तो फॅन आहे, ज्याला विराट मिस करत आहे, असेही त्याने लिहले आहे. तसेच अर्जून कपूर यानेही या व्हिडिओवर कंमेन्ट करत म्हणाला की, किमान षटकारचे तर , बोलायचे होते. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. यासोबत कमेंटचाही वर्षाव होत आहे.