RCB vs CSK (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025  (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे.

हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RCB Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 21 सामने जिंकले आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फक्त 11 सामने जिंकले आहेत. एकाही सामन्यात निकाल लागलेला नाही. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. (हे देखील वाचा: CSK vs RCB, IPL 2025 8th Match Winner Prediction: सीएसके की आरसीबी कोणाचा असणार वरचष्मा? कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट)

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

ऋतुराज गायकवाड: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाडने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान, ऋतुराज गायकवाडने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडची आक्रमक फलंदाजी सीएसकेसाठी गेम चेंजर ठरू शकते.

रवींद्र जडेजा: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 349धावा केल्या आहेत. या काळात रवींद्र जडेजाने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर रवींद्र जडेजा स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

नूर अहमद: चेन्नई सुपर किंग्जचा घातक गोलंदाज नूर अहमदने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, नूर अहमदने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये नूर अहमदची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नूर अहमदने चार विकेट्स घेतल्या होत्या.

विराट कोहली: आरसीबीचा घातक फलंदाज विराट कोहलीने गेल्या 10 डावांमध्ये 425 धावा केल्या आहेत. या काळात विराट कोहलीने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. विराट कोहलीचे शानदार टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना आरसीबीच्या बाजूने वळवू शकतात.

रजत पाटीदार: आरसीबीचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रजत पाटीदारने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा रजत पाटीदार लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.

यश दयाल: आरसीबीचा स्टार गोलंदाज यश दयालने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. यश दयालचे अचूक यॉर्कर आणि स्विंग फलंदाजांना त्रास देऊ शकतात.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नाथन एलिस, खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल.