भारतीय क्रिकेट संघातला मराठमोळा चेहरा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने ट्वीटरावर अजिंक्यचं अभिनंदन करत ही गोड बातमी शेअर केली आहे. हरभजनच्या ट्वीटनंतर चाहत्यांकडून अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काही महिन्यांपूर्वी अजिंक्यने सोशल मीडियावरूनच राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत लवकरच 'बाबा' होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. अजिंक्य रहाणे हा सध्या दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. पहा या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स .
हरभजन सिंहचे ट्वीट
Congratulations new daddy in town @ajinkyarahane88 hope Mum and lil princess 👸 are doing well.. fun part of life starts now ajju. #fatherhood
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 5, 2019
राधिका आणि अजिंक्य रहाणे यांचा प्रेमविवाह आहे. 26 नोव्हेंबर 2014 साली ते लग्नबेडीत अडकले. लहानपणापासूनच मित्र असलेले राधिका आणि अजिंक्य यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.