विझॅकमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताने आपली पकड आणखी मजबूत केली आहे. सामना संपण्यापूर्वी आफ्रिकेने 11 धावांवर एक विकेट गमावली आहे. भारत आता विजयापासून 9 विकेट दूर आहे.
IND 323/4 in 67 Overs| IND vs SA 1st Test Match 2019 Day 4 Live Score Updates: टीम इंडियाचा दुसरा डाव 323/4 वर घोषित, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 394 धावांचे लक्ष्य
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डीन एल्गार (Dean Algar) याच्या दीडशे धावांनी आफ्रिकी संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर, अंतिम सत्रात एका पाठोपाठ गेलेल्या तीन विकेटनंतर बॅकफुटवर गेलेला आफ्रिकेचा संघ एल्गारच्या 160 धावांनी पुन्हा चांगल्या स्थितीत पोहचला. तिसऱ्या दिवसाखेर आफ्रिकेने 8 बाद 385 धावा केल्या. भारताकडे अजूनही 117 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी सर्वांच्या नजरा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यावर असणार आहे. आफ्रिकेच्या पहिल्या डावात अश्विनने 5 विकेट घेतल्या होत्या. आजही अश्विनने त्याच्या शानदार प्रदर्शन सुरु ठेवले तर तो टेस्टमध्ये सर्वात जलद 350 विकेट घेणार गोलंदाज बानू शकतो. यापूर्वी, श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याने सर्वात जलद 350 टेस्ट विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांना नियंत्रण ठेवता आले नाही आणि याचा फायदा उचलत एल्गार आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी शतकी भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. त्यानंतर, अश्विनने फाफला 55 धावांवर बाद केले. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि एल्गर यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. एल्गारने यादरम्यान त्याने शतक आणि नंतर दीडशे धाव पूर्ण केल्या. एल्गर आणि डी कॉक यांनी 150 धांवांची भागिदारी केली. भारताला एका मोठ्या विकेटची गरज होती आणि रवींद्र जडेजा याने एल्गारच्या रूपात ती मिळवून दिली. एल्गर 18 चौकार, 4 षटकार लगावत 160 धावा करत बाद झाला. दरम्यान 2010 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतात कसोटीमध्ये शतकी खेळी केली आहे.
एल्गारला बाद करत जडेजाने आपल्या कसोटी करिअरमधल्या 200 विकेट पूर्ण केल्या. जडेजाने डाव्या हाताचा फिरकीपटू म्हणून केलेली ही केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. जडेजाने 44 सामन्यात 200 विकेट घेण्याची कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी जडेजाने 2 विकेट घेतल्या.