कोरोना व्हायरस-सक्तीच्या ब्रेकने ऑस्ट्रेलियाचा (Australia) वनडे आणि टी-20 कर्णधार आरोन फिंचला (Aaron Finch) कारकीर्दीचे पुनर्मूल्यांकन करण्यास मदत झाली आणि त्याने भारतात 2023 वनडे वर्ल्ड (India 2023 World Cup) कपपर्यंत आपली कारकीर्द वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 वर्ल्ड कप फायनलसह आपली कारकीर्द संपवण्याचा विचार करत असल्याचे फंचने सांगितले. “या टप्प्यात माझी शेवटची तारीख भारतातील 2023 विश्वचषक फायनल आहे. ते माझे ध्येय आहे आणि मी त्यावर चिकटून आहे,” सेन रेडिओ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत फिंचने म्हटले. “माझ्या मनात असेच होते, परंतु मला वाटते की या कालावधीने याची पुष्टी केली आहे. तोवर मी 36 वर्षाचा होईन, साहजिकच फॉर्म, दुखापत आणि इतर गोष्टी देखील यात एक भूमिका निभावतील.” (Australia Tour of England 2020: सप्टेंबर महिन्यात होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाच्या 21 सदस्यीय संघाची घोषणा, जाणून घ्या पूर्ण शेड्युल)
33 वर्षीय फलंदाजाने सांगितले की पाच महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीने त्याच्यात नवीन चैतन्य निर्माण केलं आहे आणि 2021 आणि 2022 मधील टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर 2022 वनडे विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याची त्याची इच्छा आहे. चार महिन्यांच्या सक्त विश्रांतीनंतर फिंच आणि ऑस्ट्रेलियासंघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सुरु करेल. 4 सप्टेंबरपासून साऊथॅम्प्टन येथे तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळतील आणि त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.
फिंच म्हणाला की, वर्षाला 10-11 महिने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी हा ब्रेक मानसिकवृत्त्या फ्रेश होण्यासाठी आवश्यक होते जे यापूर्वी खेळाडू वेळेअभावी करू शकला नव्हता. कोविड-19 लॉकडाऊनमुळे तो खेळाला किती मिस करत होता हे देखील फिंचने कबूल केले. “मी पुन्हा खेळण्यास प्रारंभ करण्यास उत्सुक आहे. त्याला पाच महिने झाले आहेत आणि मी विचार करतो की प्रत्येकासाठी काही काळ हा विश्रांतीचा ब्रेक मिळाला नाही, मला वाटते की पहिल्या तीन महिन्यांनंतर त्यातील नवीनता थांबली आणि तेव्हापासून प्रत्येकजण त्यामध्ये परत येण्यासाठी उत्सुक आहे,” त्याने पुढे म्हटले.