MI vs CSK, IPL 2024 29th Match: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर
MI vs CSK (Photo Credit - X)

MI vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 29 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या रोमांचक सामन्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत आणि आजही या दोघांमध्ये चांगला सामना पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्सने पहिले 3 सामने गमावल्यानंतर आणि सलग 2 सामने जिंकून पुनरागमन केले आहे.

सर्वांच्या नजरा असतील या दिग्गज खेळाडूंवर 

अजिंक्य रहाणे: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेचा या मैदानावर आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध खूप चांगला रेकॉर्ड आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेही चांगले योगदान देऊ शकतो.

रचिन रवींद्र: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रही या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकतो. रचिन रवींद्रला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगले योगदान देता आले नसले तरी आज रचिन रवींद्र मोठी धावसंख्या करू शकतो.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना.