5 वेळा जेव्हा महेंद्र सिंह धोनी ने क्रिकेटच्या मैदानावर गमावला ताबा, चिडलेल्या 'कॅप्टन कूल'ने अंपायर आणि खेळाडूंशी घातला आहे वाद
महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कूल' (Captain Cool) म्हणून ओळखले जाते. त्याने तशी अनेक उदाहरणही दिली आहे. सामन्यात कोणतीही परिस्थिती असो, ते खूप शांत राहतो आणि कधीही आपल्यावरील ताबा गमावत नाहीत किंवा उत्साही होत नाहीत. धोनीच्या मनात काय चालले आहे हे शोधणं टीम इंडियाच्या क्रिकेटर्ससाठीहीअवघड आहे, कारण माही त्याच्या हावभावाचा अंदाज लावता येत नाही. पण जर आपल्याला असे वाटत असेल की धोनी जितका शांत आहे जितके आपण पाहिले आहे तर आपण चुकीचा विचार करत आहेत. धोनीच्या कारकीर्दीत असे अनेक प्रसंग घडले जेव्हा तो स्वत:वर ताबा ठेवू शकला नाही आणि त्याचा राग सर्वांसमोर उघडकीस आला.

धोनी जेव्हा मैदानात चिडला त्याचीही आणखी बरीच उदाहरणं आहेत. जाणून घेऊया अशा 5 घटना जेव्हा धोनीने मैदानात आपला ताबा गमावला.

1. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात अंपायरशी घातला वाद

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समधील आयपीएलमधील सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे धोनी मॅच सुरु असताना मैदानावर आला. नो बॉलवरील अंपायरच्या निर्णयानंतर धोनीने स्वतःवरील ताबा गमावला आणि भारतीय पंच उल्हास गंधे यांच्याशी वाद घालण्यासाठी मैदानात दाखल झाला. धोनी ज्या प्रकारे डगआऊटमधून मैदानावर आला आणि त्याने अंपायरशी वाद घातला, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर धोनीने त्याच्या 50% मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला.

2. मायकल हसी, अंपायर आणि धोनी

भारतीय संघ 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माइकल हसीला सुरेश रैनाच्या चेंडूवर स्टम्प आउट म्हणून बाद झाला. मैदानाबाहेर जात असताना अंपायरने त्याला परत बोलावले. धोनी खूप चिडला आणि त्याने अंपायरशी वाद घातला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि नंतर हसीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

3. धोनीने दीपक चाहरला फटकारले

किंग्ज इलेव्हन पंजाबला अंतिम दोन षटकांत 39 धावांची गरज असताना दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जसाठी  आला. त्याने चेंडू कमरेच्या वर टाकला ज्याच्यावर चौकार गेला. यानंतर, सलग दुसरा बॉलही अशाच प्रकारे फेकला ज्यावर त्यांनी दोन धावा केल्या. अशा प्रकारे बॉल न फेकता 8 धावा बनल्या. यानंतर धोनी त्याच्यावर चिडला. धोनीने फटकारल्यावर चाहरचा गोंधळ उडालामात्र, यानंतर त्याने अवघ्या पाच धावा दिल्या आणि डेविड मिलरची विकेटही घेतली.

4. मनीष पांडेवर चीडला धोनी

सेंच्युरियनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका टी20 सामन्यात धोनी आणि मनीष पांडे फलंदाज करत होते. दरम्यान, नॉन-स्ट्रायकरला उभा असलेला मनीष इतरत्र पहात होता, यावर धोनी संतापला आणि त्याने लगेच त्याला फटकारले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

5. मुस्तफिजुर रहमानवर रागावले

बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यादरम्यान धोनी मुस्तफिजुर रहमानवर रागावला. धोनी धाव घेण्यासाठी वेगाने धावत होता आणि त्यादरम्यान मुस्तफिजूर त्याच्यामध्ये आला. रन पूर्ण केल्यावर धोनीने मुस्तफिजूर पाहून आपला संताप व्यक्त केला.

जेव्हा खेळाडू मैदानावर असतो तेव्हा भावनांची भरती इतकी तीव्र होते की इच्छा नसतानाही त्याच्याकडून अशी प्रतिक्रिया येते जी आपण यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. धोनीबरोबरही असे बर्‍याच वेळा घडले आहे.