
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला आहे. दरम्यान, सामन्यामध्ये हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने एक चूक केली जी क्रिकेटच्या जगात क्वचितच पाहायला मिळते. सुरुवातीला पंचांनी निर्णय बाद दिला आणि फलंदाज पॅव्हेलियनमध्येही गेला, पण नंतर कळले की तो नो बॉल होता. (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Points Table Update: हैदराबादचा पराभव करुन मुंबईने घेतली मोठ्या स्थानी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)
A NO BALL BECAUSE HEINRICH KLAASEN'S GLOVES WERE IN FRONT. pic.twitter.com/QDmqLd76f1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2025
काय झाली होती चूक
डावाच्या सातव्या षटकात कर्णधार पॅट कमिन्सने झीशान अन्सारीला चेंडू दिला. त्याने मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रायन रिकेलटनलाही बाद केले. हा त्याच्या षटकातील पाचवा चेंडू होता. पॅट कमिन्सने रायन रिकेलटनला बाद करण्यासाठी एक शानदार झेल घेतला. पण दरम्यान तिसऱ्या पंचांनी एक मोठी चूक पकडली. चेंडू बॅटला लागण्यापूर्वी यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनचे ग्लोव्हज स्टंपच्या पुढे होते. जे क्रिकेटच्या नियमांनुसार चुकीचे आहे. यानंतर पॅट कमिन्सने झेल घेतला. ही चूक कोणालाही समजली नाही आणि रायन रिकेलटन मैदान सोडत होता आणि सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनीही आपापसात आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण नंतर तिसऱ्या पंचांनी क्लासेनची चूक पकडली आणि तो नो बॉल घोषित करण्यात आला. याचा अर्थ रायन रिकेलटन अचानक आउटवरून नॉट आउट झाला. क्लासेनच्या चुकीमुळे रायनला जीवदान मिळाले.
हैदराबादचे फलंदाज छाप पाडू शकले नाहीत
वानखेडे मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. तथापि, पहिल्याच षटकात दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळाले. अभिषेक 28 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. तर, हेडने 29 चेंडू खेळून 28 धावा केल्या. इशान किशन पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त 2 धावा करता आल्या. 19 धावा काढल्यानंतर नितीश रेड्डी ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेनरिक क्लासेनने 28 चेंडूत 37 धावा फटकावल्या, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 162 धावा करू शकला.