भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळल्या जाणार्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पावसाची (Rain) शक्यता खूप जास्त आहे. Accuweather.com नुसार, येथे 80% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 3 ते 4 तास हलका किंवा जोरदार पाऊस पडू शकतो. या सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसामुळे सुमारे तासभर खेळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात 17 षटके कमी टाकण्यात आली. सामन्याच्या तिसर्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे, जरी त्याची फक्त 25% शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी तापमान 10 ते 20 अंशांच्या दरम्यान असेल. बर्मिंगहॅममध्ये सामन्याच्या चौथ्या दिवशी हवामान स्वच्छ असेल.
या दिवशी पावसाची शक्यता फक्त 3% आहे. त्याचवेळी, सामन्याच्या पाचव्या दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पावसाची शक्यता 12% वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान येथे हवामान थंड राहील. पहिल्या दिवशी, पहिल्या दिवशी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. हेही वाचा IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक झळकावून ऋषभ पंतने सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला 98 धावांपर्यंत मजल मारताच 5 बळी घेतले. येथून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी 222 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. पंतने 111 चेंडूत 146 धावांची खेळी केली. दुसरीकडे, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा 83 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 338 धावा केल्या होत्या.