जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती दर्शनाला पोहचला ब्रेट ली
Brett Lee at the GSB Seva Mandal in Sion. (Photo: @ANI/Twitter)

मुंबई :  गणेश चतुर्थी पासून पुढील दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. घरगुती गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही भक्त उत्साहाने गणेश मूर्तीचं दर्शन घेत आहे. गणपती बाप्पाचं अप्रूप केवळ भारतीयांना नव्हे तर परदेशी नागरिकांनाही आहे. यंदा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ब्रेट ली यानेदेखील जीएसबी सेवा  मंडळ, किंग्ज सर्कल येथील गणपतीचं दर्शन घेतलं. भारत देश हा दुसरं घर समजणार ब्रेट ली यापूर्वी अनेक भारतीय सणांचा आनंद लुटताना दिसला आहे.

भारतीय वेशभूषेत ब्रेट ली

जी एस बीच्या गणपतीची ओळख मुंबईतील श्री मंत गणपती अशी आहे. या गणपतीची आरास चांदीमध्ये केलेली आहे. सोन्याच्या आभूषणांनी जी एसबीचा गणपती मढलेला आहे. किंग्ज सर्कलच्या या गणपतीला भेट देताना ब्रेट ली पिवळा कुडता आणि पायजमा अशा अस्सल भारतीय पारंपारीक वेशभूषेत आला होता. सध्या Asia Cup 2018 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर म्हणून ब्रेट ली भरतामध्ये आहे.  आगामी Asia Cup च्या कॉमेंट्री टीमचाही ब्रेट ली एक भाग आहे. मुंबईतील 'या' लोकप्रिय गणपती मंडळांना नक्की भेट द्या !

 ब्रेट लीचा विश्वास

विराट कोहलीचा अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स होत नसल्याने भविष्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर भारतीय फलंदाजीची भिस्त आहे. असा ब्रेट लीचा विश्वास आहे. Asia Cup मध्ये या दोन खेळाडूंच्या परफॉर्मन्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.