ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क लवकरच युजर्सना एक मोठी भेट देणार आहेत. आतापर्यंत ट्विटर वापरकर्ते केवळ 280 शब्द ट्विट करू शकत होते, परंतु लवकरच त्यांना 10,000 शब्द लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळेल. मस्क यांनी स्वतः एका ट्विटला उत्तर देताना हे सांगितले. मात्र 10,000 कॅरेक्टरमध्ये ट्विट करण्याचे फीचर पेड अर्थात ट्विटर ब्लू चा भाग असेल की नाही हे एलोन मस्कने सांगितले नाही. यूएस मधील ट्विटर ब्लू सदस्य 4,000 कॅरेक्टरपर्यंत ट्विट करू शकतात. ट्विटरच्या 16 वर्षांच्या इतिहासात ट्विट करण्याची मर्यादा वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. 2017 मध्ये, ट्विटरने कॅरेक्टर मर्यादा 140 वरून 280 वर्णांपर्यंत वाढवली होती.
As an attachment? How many chars? We are extending longform tweets to 10k soon.
— Elon Musk (@elonmusk) March 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)