International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत

जगभरात 24 जून 2024 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत
Photo Credit -X

International Yoga Day 2024: जगभरात 24 जून 2024 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी योग कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी उष्ट्रासन(Ushtrasana ) या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'उष्ट्रासनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात. शरिरात रक्ताभिसरण सुधारते. त्या सोबतच दृष्टीही सुधारते', असे पंतप्राधान मोदी यांनी व्हिडीओ शेअर करताना त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहीले आहे. (हेही वाचा:PM Modi On Yoga Day 2024: पीएम मोदींनी 'ट्विटर एक्स' वर योग दिनासंदर्भात शेअर केला अनोखा संदेश, पाहा पोस्ट )

या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यास शरीरात वेगळे चैतन्य निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते. त्यामुळे निरोगी जीनव आपण जगू शकतो. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ठ, अपचन दूर होण्यास मदत होते.

पोस्ट पाहा- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 11:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).