भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाबद्दल बनावट बातम्या आणि चुकीची माहिती असलेल्या 5,000 पोस्ट महाराष्ट्र सायबरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकल्या आहेत. एका अधिकाऱ्याने शनिवारी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या मते, लष्कराच्या हालचाली, धोरणात्मक कारवाया किंवा शेजारील देशांकडून प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांबद्दल बनावट बातम्या सोशल मीडियावर आढळल्या होत्या. त्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हे शोध संस्थेने लष्करी संघर्षाशी संबंधित बनावट बातम्या आणि चुकीची माहिती पसरवण्याबाबत काही सुचना जारी केल्या आहेत.
अशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या कंटेंटमुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो. अशा बनावट बातम्या आणि चुकीच्या माहितीची गंभीर दखल घेत, एजन्सीने सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशा खोट्या बातम्या काढून टाकण्यासाठी नोटिसा जारी केल्या आहेत. सायबर सेलनुसार, विभाग सुरक्षित आणि विश्वासार्ह माहिती वातावरण राखण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म ऑपरेटर आणि अंमलबजावणी एजन्सींशी समन्वय साधत राहील. (हेही वाचा: Pune: पुण्यात Khadeeja Sheikh नावाच्या मुस्लिम विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली पाकिस्तान समर्थक पोस्ट; Sinhagad College ने केले निलंबित)
India-Pakistan Conflict:
STORY | Maharashtra Cyber takes down 5,000 social media posts with misinformation about India-Pak conflict
READ: https://t.co/rXvXWTltNd pic.twitter.com/pggtSmyqFx
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)