Pune: पुण्यात Khadeeja Sheikh नावाच्या मुस्लिम विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली पाकिस्तान समर्थक पोस्ट; Sinhagad College ने केले निलंबित
महाविद्यालयाने म्हटले आहे की, ‘संस्थात्मक नीतिमत्ता जपण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरी आणि शैक्षणिक वर्तनाचे पालन करावे यासाठी,’ हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने खादिजा शेख नावाच्या 19 वर्षीय मुस्लिम विद्यार्थिनीला निलंबित केले आहे. खादिजाने इंस्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि भारतविरोधी भावना व्यक्त करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिचे निलंबन झाले आहे. ही कारवाई 9 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आली, आणि त्याच दिवशी पुणे पोलिसांनी खादिजाला अटक केली. ही घटना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सैन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. खादिजाच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या पोस्ट्सचे स्क्रीनशॉट्स होते, ज्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘हिंदुत्व अतिरेक’ यासारख्या उल्लेखांचा समावेश होता. या पोस्ट्समध्ये भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या कारवाईवर टीका करण्यात आली होती.
याबाबत महाविद्यालयाने म्हटले आहे की, ‘संस्थात्मक नीतिमत्ता जपण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरी आणि शैक्षणिक वर्तनाचे पालन करावे यासाठी,’ हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (झोन 5) राजकुमार शिंदे म्हणाले, या मुलीवर भारतीय न्याय संहिता कलम 152 (भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये), 196 (वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 299 (धार्मिक भावना भडकवणे) आणि 352 (शांतता भंग करण्यासाठी जाणूनबुजून केलेला अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: India-Pakistan Tensions: किनारपट्टीच्या रक्षणासाठी मच्छिमार बनणार महाराष्ट्र सरकारचे 'डोळे आणि कान'; ‘सुरक्षा निर्देश’ जारी)
मुस्लिम विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची पोस्ट-
Khadeeja Sheikh rusticated from Sinhagad college #Pune for sharing a blatant Instagram post supporting #Pakistan.
College highlights anti-India statements of the girl.
1/n pic.twitter.com/NittlRj5PP
— Siddhi 🇮🇳 (@sidis28) May 10, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

