याआधी जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) देशातील ऑनलाइन रिअल मनी गेमिंग (RMG) क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे डझनभर कंपन्यांना कारणे दाखवा पूर्व नोटीस पाठवली होती. ही कारणे दाखवा नोटीस सुमारे 55,000 कोटी रुपयांची आहे. आता रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना किमान 49,000 कोटी रुपयांच्या नवीन कर नोटिसा मिळाल्या आहेत. यामध्ये Dream11 ला 28,000 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. तसेच Games24x7 ला 21,000 कोटी रुपयांची कर मागणी नोटीस आहे. पूर्वी Dream11 ला 18,000 कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. ड्रीम 11 ने यापूर्वीच महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या नोटीसवर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सध्या सर्व ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंग कंपन्या डीजीजीआयच्या रडारवर आहेत. (हेही वाचा: Global Mobile Speed Ranking: 5G स्पीडमुळे मोठी क्रांती, भारत इंटरनेट विश्वात शेजारी राष्ट्रेच नव्हे तर G-20 देशांच्याही पुढे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)