5G Spectrum | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Mobile Speed in India: 5G सेवा लाँच केल्यापासून भारताने मोबाईल डाऊनलोड स्पीडमध्ये भारताने क्रांती केली आहे. ज्यामुळे या देशाचा स्पीड जपान (Japan), यूके आणि ब्राझील (Brazil)यांसारख्या राष्ट्रांच्या तुलनेत वधारला आहे. स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारत 47 व्या स्थानावर आहे, असे ओकलाने म्हटले आहे. ओकला हा इंटरनेट विश्वातील स्पीड तपासणारा प्रमुख ब्रँड म्हणून ओळखला जातो. एक निरीक्षण नोंदवत ओकलाने म्हटले आहे की, 5G सुरू झाल्यापासून भारताची गती कामगिरी 3.59 पट वाढली आहे. देशाच्या 5G प्रगतीला "उल्लेखनीय" म्हणून कौतुकाने उल्लेखण्यात आले आहे.

उल्लेखनिय असे की, भारत केवळ बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांसारख्या शेजारी देशांपेक्षा पुढे नाही तर मेक्सिको (90 व्या), तुर्की (68 व्या), यूके (62 व्या), जपान (58 व्या), ब्राझील (50 वे स्थान), आणि दक्षिण आफ्रिका (48 वे स्थान)सारख्या काही G20 देशांच्याही पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.

ओकलाने पुढे म्हटले आहे की, 5G सुरू झाल्यापासून भारताच्या गती कामगिरीत 3.59 पट वाढ झाली आहे, सरासरी डाउनलोड गती सप्टेंबर 2022 मध्ये 13.87 Mbps वरून ऑगस्ट 2023 मध्ये 50.21 Mbps झाली आहे. या सुधारणेमुळे स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची वाढ झाली आहे, 72 स्थानांनी वाढ झाली आहे, 119 व्या स्थानावरून 47 व्या स्थानावर आहे.

Ookla बद्दल थोडक्यात

फिक्स्ड ब्रॉडबँड आणि मोबाइल नेटवर्क चाचणी ऍप्लिकेशन्स, डेटा आणि विश्लेषणामध्ये ओकला जागतिक आघाडीवर आहे. Speedtest आणि Downdetector ची मातृकंपनी म्हणून, Ookla कडे पाहिले जाते. या कंपनीकडे जगभरातील इंटरनेट वेग चाचणी प्रणाली आणि इतर काही तांत्रिक बाबींचे विश्लेषण करण्याची मोठी शक्ती आहे. आमच्या शेवटच्या अद्ययावत माहितीनुसार, Ookla चे मुख्यालय सिएटल, WA येथे मेम्फिस, टेनेसी आणि डब्लिन, आयर्लंड येथे अतिरिक्त कार्यालयांसह स्थित आहे.