Apple Layoffs: अॅपल कंपनीने त्यांच्या ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अॅपलने कॅलिफोर्नियामध्ये ही टाळेबंदी केली आहे. कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम असा झाला की गुरुवारी अमेरिकन बाजारात अॅपलचे शेअर्स 0.49 टक्क्यांनी घसरून $168.82 वर आले. असे सांगण्यात येत आहे की, टाळेबंदीमुळे प्रभावित झालेले सर्व कर्मचारी अॅपलच्या नवीन कार प्रकल्पावर काम करत होते.( हेही वाचा- सावध रहा! तुमचा फोनला सायबर फसवणुकीचा धोका; 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)