आयफोन निर्माता Apple आपल्या काही निवडक विभागांमधील कर्मचारी काही प्रमाणात कमी करत आहे. संभाव्य कर्मचारी कपातीचा कंपनीच्या विकास आणि उत्पादन वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, कामावरुन कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही.

दावा केला जात आहे की,कंपनीतील ज्या विभागातील कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यांच्यावर जगभरातील Apple रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधांच्या देखभालीची जबाबदारी आहे. सांगितले जात आहे की, संभाव्य आर्थिक मंदीच्या चिंतेच्या दरम्यान ही बातमी आली आहे. ज्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी झाल्या आहेत. बिग टेक कंपन्या देखील यापासून वाचल्या नाहीत

ट्विट

मेटा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Facebook नेही गेल्या महिन्यात जाहीर केला की ते 10,000 नोकर्‍या कमी करतील. पहिल्या फेरीत कंपनीने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. लवकर मेटा कर्मचारी कपातीची पुढचीही फेरी काढणार असल्याचे समजते.

दरम्यान, केवळ फेसबुकच नव्हे तर अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूरल, झोमॅटो, स्वीगी, उबेर यांसारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)