SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) होणार आहे. या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. (हे देखील वाचा: CSK vs PBKS, IPL 2024 Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
The 𝙎𝙩𝙖𝙜𝙚 is set for the @SunRisers and @rajasthanroyals, and the stakes have never been higher 🥵
Catch them LIVE in action, starting 6:30pm only with #IPLonJioCinema 📲#TATAIPL #SRHvRR pic.twitter.com/cahOckv2JB
— JioCinema (@JioCinema) May 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)