IND vs BAN 2nd Test 2024: पावसामुळे दोन दिवस वाया गेल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी कानपूरमध्ये सुरू झाला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस नसल्याने मैदान खेळण्यायोग्य असल्याने पंचांनी दोन्ही संघांना मैदानात उतरवले. बांगलादेशने पहिल्या सत्रातच विकेट गमावण्यास सुरुवात केली. पण सर्वात मोठी विकेट शकिब अल हसनची होती ज्याचा झेल मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) घेतला. आर अश्विनच्या षटकात शाकिब अल हसनने सिराजच्या डोक्यावर शाॅट मारण्याचा प्रयत्न केला. हा शानदार झेल घेताना सिराजने दुखापत होण्याचा विचारही केला नाही. सिराजचा झेल पाहून सगळेच अवाक् झाले. शाकिब अल हसनच्या रूपाने बांगलादेशला सहावा मोठा धक्का बसला होता. शाकिब अवघ्या 9 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)