Maharashtra Assembly Election Result 2024: पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पालगघरमध्ये बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वसईत हितेंद्र ठाकूर तर नालासोपारा मतदार संघामध्ये क्षितीज ठाकूर यांनी सुरवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळवल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी पैसे वाटपावरून भाजप आणि बविआमध्ये मोठे आरोप प्रत्यारोप झाले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.
पाहा पोस्ट -
महाराष्ट्र के शुरुआती रुझानों में नालासोपारा से क्षितिज ठाकुर पीछे #MaharashtraElection2024 | #ResultsOnTV9 | #ElectionResults | pic.twitter.com/0wAU36ZXjY
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)