Dilip Walse Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) प्रचंड उत्कंटावर्धक ठरली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी 8.00 वाजलेपासून सुरुवात झाली. मतमोजणीस सुरुवात झाली तेव्हापासूनच आघाडी आणि पिछाडी हे दोन शब्द परवलीचे झाले आहेत. सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. त्यानुसार अर्थात हे कल म्हणजे अंतिम निकाल नाही. तरीसुद्धा हाच कल कायम राहिल्यास निकाल धक्कादायक लागू शकतो. पिछाडीवर असलेले प्रमुख नेते.

आघाडीवर असलेले महायुतीतील नेते

  • एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)
  • देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)
  • अजित पवार (उपमुख्यमंत्री)
  • आदित्य ठाकरे (शिवसेना (UBT))
  • गिरीश महाजान (भाजप)
  • दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)
  • नाना पटोले (काँग्रेस)
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)
  • तानाजी सावंत (शिवसेना- एकनाथ शिंदे)
  • आशिष शेलार (भाजप)
  • राहुल नार्वेकर (भाजप) (हेही वाचा, Maharashtra Assembly Election Result 2024: वसईत हितेंद्र, तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर आघाडीवर)

पिछाडीवर असलेले नेते

  • दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)
  • दादा भुसे (शिवसेना- एकनाथ शिंदे)

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल आज (23 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी 288 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकेच्या मोजणीवर आधारित प्रारंभिक कलानुसार राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महायुतीला शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी (SP) आणि काँग्रेस पक्षाच्या महा विकास आघाडीविरुद्ध आघाडी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लढणारे गट एकमेकांविरुद्ध लढताना दिसलेल्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या सहा पक्षांसाठी या निकालाकडे एक लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे. लोकसभेच्या पराभवानंतर एमव्हीए विरुद्धची लाट बदलण्याची आशा एनडीएला आहे, तर राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी जूनपासून ही गती कायम ठेवण्याची आशा अघाडीला आहे.