Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
महाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा (Vidhan Sabha) जागांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. 15 व्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे आता या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर सुरूवातीला कल आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 6 प्रमुख पक्षांमध्ये लढली गेली आहे त्यामुळे या निवडणूकीच्या निकालांकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच राज्यात सुमारे 65% मतदान झाले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? हे पाहणं उत्सुकतचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात निवडणूकांपूर्वी शिंदे सरकार ने आणलेली लाडकी बहीण योजना, शिवसेना, एनसीपी पक्ष फूटीनंतर बदललेलं राजकारण ते मनसे फॅक्टर, आरक्षण या सार्यांचा या मतदानात किती आणि कसा प्रभाव पडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आणि सट्टाबाजाराच्या अंदाजानुसारही राज्यात महायुतीचं सरकार येणार असा अंदाज आहे.
महायुती विरूद्ध महा विकास आघाडी या लढाई मध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ही निवडणूक मनसे साठी देखील महत्त्वाची आहे. आजच्या निकालानंतर 26 नोव्हेंबर पर्यंत नवं सरकार स्थापनं करावं लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्रात मागील निवडणूक निकालानंतर जशी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती तशीच राष्ट्रपती राजवट यंदाही लागू करावी लागणार आहे.