London Gatwick Airport On High Alert: लंडन (London) च्या गॅटविक विमानतळावरील (Gatwick Airport) टर्मिनल सुरक्षेच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहे. हे ब्रिटनमधील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सामानात संशयास्पद प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही माहिती देताना विमानतळाने पोस्ट केले की, 'घटनेच्या तपासादरम्यान, त्याच्या दक्षिण टर्मिनलचा एक भाग, जो दोनपैकी एक आहे, रिकामा करण्यात आला आहे. शिवाय, सध्या प्रवाशांना इमारतीत जाण्यापासून रोखले जात आहे.'

या संदर्भात माहिती देताना पोलिसांनी एका पोस्टमध्ये सांगितलं आहे की, 'लगेजमध्ये संशयास्पद प्रतिबंधित वस्तू आढळल्यानंतर गॅटविक विमानतळाच्या दक्षिण टर्मिनलभोवती सुरक्षा घेरा घालण्यात आला आहे. आज सकाळी 8.20 वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि खबरदारी म्हणून एक ईओडी (एक्सप्लोझिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल) टीम तैनात करण्यात आली आहे.'

लंडनच्या गॅटविक विमानतळावर आढळली संशयास्पद वस्तू - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)