धनंजय मुंडे(Edited and archived images)

Beed Vidhan Sabha Results 2024: मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीडमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आघाडीवर आहेत. ते तब्बल 3000 मतांनी आघाडीवर (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. लोकसभा निवडणुकीत परळीमध्ये सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता. भाजपच्या बड्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, लोकसभेनंतर विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकीत येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Assembly Election 2024: माहीममध्ये मनसे सुस्साट! विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच कलात अमित ठाकरे आघाडीवर)

बीड जिल्ह्यात एकूण 6 मतदारसंघ येतात. त्यामध्ये, परळी आणि माजलगावातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यात परळी, बीड, केज, माजलगाव, गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. तर, बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे समर्थक अनिल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मराठा आरक्षण चळवळीतील नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही निवडणूक लढवली. त्यामुळे येथील लढतींकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून बीड जिल्ह्यातील चित्र लवकरच स्पष्ट होईल. सध्या कोणी आघाडी घेतली आणि कोण पिछाडीवर आहे हे पाहता येईल.