Afghanistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd ODI 2024: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (AFG vs BAN 3rd OD) शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या वनडेत बांगलादेशने अफगाणिस्तानचा 68 धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदीच्या खांद्यावर आहे. तर बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करत आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आह.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन येथे पाहा
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: तनजीद हसन, सौम्या सरकार, झाकीर हसन, मेहदी हसन मिराज (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, झेकर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेलिया खरोटे, फजलहक फारुकी.
With Shanto injured, he's replaced by Zakir for Bangladesh as Mehidy Hasan Miraz takes over captaincy 🔁
No changes for Afghanistan in Sharjah 👉 https://t.co/MXym2QVNqt #AFGvBAN pic.twitter.com/xV2hRYWMJz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)