Diljit Dosanjh's Dil-Luminati Mumbai Tour: दिलजीत दोसांझ ने मुंबई मध्येही जाहीर केली शो ची तारीख; पहा कधी, कुठे, कसे होणार तिकीट बुकिंग
दिलजीतच्या मुंबई मधील शो ची तिकीट विक्री 22 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये HSBC च Cardholders साठी Pre-Sale ठेवण्यात आला आहे.
लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) कॉन्सर्ट देशा-परदेशात तुफान हीट झाल्यानंतर त्याने आपल्या Diljit Dosanjh's Dil-Luminati टूर मध्ये मुंबई देखील समाविष्ट केले आहे. दिलजीतची मुंबई मधील कॉन्सर्ट 19 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता असणार आहे. या कॉन्सर्टची तिकीट विक्री 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या दिलजीतच्या कॉन्सर्टच्या तिकीट्स अल्पावधीतच SOLD OUT होत असल्याने त्याच्या चाहत्यांना झटपट त्याचं बुकींग करावं लागणार आहे.
दिलजित च्या मुंबई मधील शो चं ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आले नाही.पण मुंबई मध्ये प्रशस्त ठिकाणी ही कॉन्सर्ट होणार असल्याचा अंदाज आहे. लवकरच त्याची माहिती दिली जाईल. दरम्यान पंजाबी ठेक्यावर थिरकायला चाहते या कॉन्सर्ट मध्ये मोठी गर्दी करतात. Diljit Dosanjh Pauses Ahmedabad Concert: दिलजीत दोसांझने अहमदाबाद कॉन्सर्टमधील परफॉर्मन्स थांबवला, हॉटेलच्या बाल्कनीतून तिकिटांशिवाय शो पाहणाऱ्यांवर मारला टॉन्ट (Watch Video).
Diljit Dosanjh's Dil-Luminati Mumbai Tour तारीख
View this post on Instagram
तिकीट बुकिंग कशी होणार?
दिलजीतच्या मुंबई मधील शो ची तिकीट विक्री 22 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये HSBC च Cardholders साठी Pre-Sale ठेवण्यात आला आहे. HSBC चं कार्ड वापरून तिकीट बुकिंग करणारे दुपारी 2-5 या वेळेत तिकीट घेऊ शकतात. जनरल बुकिंग सुरू होण्यापूर्वी त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर जनरल बुकिंग संध्याकाळी 5 नंतर होणार आहे. ही तिकीट्स Zomato Live वर उपलब्ध असणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

