Push Ups World Records: कॅनडाच्या 59 वर्षीय डोनाजीन वाइल्डने (DonnaJean Wilde) ‘इज इज जस्ट अ नंबर’ असल्याचे सिद्ध केले आहे. डोनाजीन यांनी एका तासात 1,575 पुश-अप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा अद्भुत पराक्रम केला. वयाच्या या टप्प्यावर जेव्हा लोक हाडांच्या बळकटीसाठी सप्लिमेंट्सवर अवलंबून असतात, तेव्हा त्यांनी हे यश संपादन केले आहे. या पुश-अपसाठी विशेष मानकांचे पालन केले गेले. प्रत्येक पुश-अपसाठी कोपर 90 अंशांपर्यंत वाकवणे आणि नंतर हात पूर्णपणे सरळ करणे आवश्यक आहे. दोन स्वतंत्र साक्षीदारांनी त्यांची गणना केली. डोनाजिनने सुरुवातीला 20 मिनिटांत 620 पुश-अप पूर्ण केले. यानंतर तिने 15 मिनिटांसाठी 20 आणि 5 पुश-अपचे सेट केले. सरतेशेवटी तिने प्रति सेट सरासरी 10 पुश-अपसह जुना विक्रम मोडला. यावेळी डोनाजीन यांची 11 आणि 12 वर्षांची नातवंडे यांनी त्यांना त्यासाठी सतत प्रोत्साहन देत राहिले. डोनाजीन यांनी मार्चमध्ये केलेल्या त्यांच्या मागील विक्रमानंतर आता हा नवीन विक्रम केला आहे. मार्च महिन्यात त्यांनी 4 तास 30 मिनिटे आणि 11 सेकंद प्लँक स्थितीत राहून जगाला चकित केले होते. (हेही वाचा: Untreated Diabetics: भारतात उपचार न केलेल्या मधुमेह रुग्णांची संख्या सर्वाधिक; Lancet च्या अभ्यासात धक्कादायक आकडेवारी)
Push Ups World Records:
DonnaJean Wilde, the American grandmother who performed the longest plank ever, has now set a new record for the most push ups in one hour with 1,575 💪
Read more ⬇️https://t.co/onsKCyUuEU
— Guinness World Records (@GWR) November 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)