Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार

कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले की, वाढत्या Leadership Crisis मुळे पाठिंबा गमावल्यानंतर ते लिबरल पक्षाचे नेते म्हणूनही राजीनामा देणार आहेत.

Justin Trudeau Resigns As PM:  जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार
Justin Trudeau | X @ANI

कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांनी पीएम पदासोबतच  लिबरल पार्टी च्या नेते पदाचा देखील राजीनामा देत असल्याची आज (6 जानेवारी) घोषणा केली आहे. 2015 पासून पंतप्रधान पदी असलेल्या Justin Trudeau या निर्णयाची घोषणा करताना भावूक झालेले दिसले. Liberal Party च्या अध्यक्षांना आपण कालच याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. पुढील नेता निवडीपर्यंत ते पदावर कायम राहणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आपण लढवय्ये आहोत असं म्हटलं आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा राजीनामा 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2025 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).