Prasar Bharati Launches OTT Platform (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

Prasar Bharati Launches OTT Platform: सध्या सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हा लोकांसाठी एक महत्वपूर्ण मनोरंजाचे साधन आहे. दरम्यान, या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मशी (OTT Platform) स्पर्धा करण्यासाठी, प्रसार भारतीने (Prasar Bharati) स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म देखील सुरू केले आहे. प्रसार भारतीने 55 व्या IFFI गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात OTT प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव Waves आहे. यामध्ये 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असणार आहे. प्रसार भारतीने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रसार भारतीने आपल्या X खात्यावर पोस्ट करून OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये प्रसार भारतीने म्हटलं आहे की, 'प्रसार भारतीने इफ्फीमध्ये WAVES OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला! क्लासिक सामग्री आणि समकालीन प्रोग्रामिंगचे समृद्ध मिश्रण ऑफर करून प्रगत डिजिटल ट्रेंड स्वीकारताना नॉस्टॅल्जिया रिफ्रेश करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे.' या OTT साठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क नाही. (हेही वाचा - WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीवर CCI चा मेटाला 213 कोटी रुपयांचा दंड; कारवाईला आव्हान मिळण्याची शक्यता)

प्रसार भारतीचा ओटीटी प्लॅटफॉर्म 'या' सुविधांनी सुसज्ज -

प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ ऑनलाइन स्ट्रीमिंग, लाइव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनेल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्री असेल. या सुविधा 12 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असतील.

ओटीटीवर Netflix, Jio Cinema, Prime Video, Disney Plus Hotstar, Zee5 आणि Sony Liv सारखे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारची सामग्री उपलब्ध आहे. अलीकडे Jio Cinema आणि Hotstar एकत्र विलीन होऊन JioStar.com बनले आहेत. आता प्रसार भारतीच्या Waves ची एन्ट्री झाल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा वाढणार आहे.