Maharashtra Assembly Election Results 2024 Saam TV Live Streaming: राज्यात जनमताचा कौल कुणाला? साम टीव्हीवर पहा महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)

राज्यात सध्याचे सरकार परतणार की जनता परिवर्तनाला कौल देणार? याची झलक निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाली. मात्र एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळतील.

Maharashtra Assembly Election Results 2024 Saam TV Live Streaming: राज्यात जनमताचा कौल कुणाला? साम टीव्हीवर पहा महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
Maharashtra Assembly Election Results

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. त्यानंतर आता आज मतदानाचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे? राज्यात सध्याचे सरकार परतणार की जनता परिवर्तनाला कौल देणार? याची झलक निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाली. मात्र एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळतील. यासह महाराष्ट्रातील निवडणूक निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यात सध्या या दोन्ही युतींमध्ये चुरशीची लढत आहे. अशात साम टीव्ही या वाहिनीवर तुम्ही विधानसभा निवडणुकांचे निकाल थेट पाहू शकता. (हेही वाचा: Maharashtra Elections Results 2024: विधानसभा निकालापूर्वीच महाराष्ट्रात सुरु झाले रिसॉर्टचे राजकारण; महाविकास आघाडी आमदारांना 'सुरक्षित ठिकाणी' एअरलिफ्ट करणार- Reports)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 11:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).