बुधवार, 6 डिसेंबर रोजी, इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स (India Capitals vs Gujarat Giants) यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या (Legends League Cricket 2023) एलिमिनेटर सामन्यादरम्यान, इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात जोरदार वाद झाला. ओव्हर संपल्यावर गंभीर श्रीसंतकडे रोखून पाहत होता. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर श्रीसंतने व्हिडिओ शेअर करुन जोरदार वादामागील कारण उघड केले. तो म्हणाला की, त्याला वीरू इत्यादी वरिष्ठ खेळाडूंबद्दल खूप आदर आहे. तो म्हणाला की यात माझी चूक नाही पण मिस्टर फायटर अर्थात गौतम गंभीरने क्रिकेटच्या मैदानावर लाईव्ह मॅचमध्ये जी भाषा वापरली होती ती सहन करण्यासारखी नव्हती. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, आज नाही तर उद्या गंभीर काय बोलला ते समोर येईल. (हे देखील वाचा: WPL लिलावापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण स्पर्धा खेळवली जावू शकते वेगवेगळ्या शहरात)

 

View this post on Instagram

 

A post shared by SREE SANTH (@sreesanthnair36)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)