एलएलसी 2023 च्या त्याच्या पहिल्या गेममध्ये खेळताना, केविन पीटरसनने एक उत्कृष्ट खेळी खेळली. केकिन पीटरसन रांचीमध्ये इंडिया कॅपिटल्ससाठी जोरदार धावसंख्येचा पाठलाग करताना जवळजवळ सामना जिंकून देणाऱ्या डावात त्याच्या शॉट्समुळे चर्चेत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अर्बनरायझर्स हैदराबादने 5 गडी गमावून 189 धावा केल्या. हैदराबादकडून तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गुरकीरत सिंग मानने 54 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. याशिवाय सुरेश रैनाने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 46(27) धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्थ इंडिया कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार गौतम गंभीर 0(1) आणि हसिम हमला 5(4) धावबाद झाला. मात्र, चौथ्या क्रमांकावर आलेल्या केविन पीटरसनने 6 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 77 (48) धावा केल्या. मात्र त्यांच्या संघाला हा सामना जिंकता आला नाही. इंडिया कॅपिटल्सने हा सामना 3 धावांनी गमावला. संघाला केवळ 186 धावा करता आल्या. दरम्यान, त्याच्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण खाली पाहू शकता. (हे देखील वाचा: Sanju Samson On Rohit Sharma Support: रोहित शर्माबद्दल संजू सॅमसन म्हणाला मोठी गोष्ट, भारताच्या कर्णधारने दिला सर्वात जास्त पाठिंबा, पाहा व्हिडिओ)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)