DJ Sandy Murder Video: झारखंडमधील रांची येथे क्षुल्लक कारणावरून एका डीजेची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल क्लिपमध्ये बंदुकीने एक जण डीजेवर गोळीबार करताना दिसत आहे. ज्याची नंतर संदीप उर्फ सँडी म्हणून ओळख पटली. रांचीमधील एका बारमध्ये किरकोळ वादातून ही घटना घडली. (हेही वाचा:Cop Sits Half-Naked Outside Police Station in Unnao: धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसमोर चक्क 'अंडरवेअर'वर बसला पोलीस; व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश (Watch))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)