केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (15 ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला आहेत. तर झारखंड 13, 20 मध्ये नोव्हेंबरला आहे. दरम्यान निवडणूकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आजपासून राज्यात आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे आता 288 जागांवर राज्यात होणार्या निवडणूकांकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर
Maharashtra to vote in a single phase on 20th November. Counting of votes on 23rd November.#MaharashtraElection2024 pic.twitter.com/U48nySwK41
— ANI (@ANI) October 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)